Ragda Patties
रगडा पॅटीसचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.
<a href= "http://www.ragdapatties.com/" target="_blank"><img alt="Ragda Patties" src="http://tinyurl.com/yavjcty"></a>

मराठी अभिमान गीत –भाग १

मराठी अभिमान गीत,सुरेश भट यांची एक कविता,जीला संगीतकार कौशल इनामदार यांनी गाण्यात रुपांतर केल.

लाभले अमास भाग्य बोलतो मराठी”हे गाण तब्बल ११२ गायक आणि ३५६ समुह गायक यांनी गायल आहे.

मराठी अभिमानगीत घरपोच योजना –दूरध्वनि ९७०२०००१११

मराठी अभिमान गीत डाउनलोड करा

Marathi Abhimaan Geet Audio

गाण्याचे बोल

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

मराठी अभिमान गीत डाउनलोड करा

Marathi Abhimaan Geet Audio

मराठी ब्लॉगर्स,स्नेह मेळावा –मुंबई

पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्यानंतर दुसरा ब्लॉगर मेळावा तुमच्या,आमच्या,सर्वांच्या –आपली मुंबई येथे आयोजित होतो आहे. रविवार,दिनांक ९ मे २०१० रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळात हा ब्लॉगर मेळावा संपन्न होईल. एकमेकांशी ओळख करून घेऊन स्नेहबंध आणखी घट्ट करावे या उद्देशाने हा ब्लॉगर मेळावा आयोजित होतो आहे. केवळ प्रस्थापित ब्लॉगर्सच नव्हेत तर ज्यांना मराठी ब्लॉग सुरू करायची इच्छा आहे अशा भावी मराठी ब्लॉगर्सचे व ब्लॉग वाचकांचेही या मेळाव्यात स्वागत आहे.

मुंबईच्या कानाकोपर्‍यातून व मुंबईबाहेरूनही ब्लॉगर्स/वाचक उपस्थित राहतील असे गृहीत धरून भेटीसाठी दादर,मुंबई हे मध्यवर्ती ठिकाण निवडले आहे. आपली उपस्थिती मोठ्या संख्येने नोंदवून आपण हा ब्लॉगर मेळावादेखील यशस्वी कराल याची खात्री आहे.

आपल्या उपस्थिती संख्येनुसारच भेटीचे नेमके स्थळ निश्चित करता येईल. आपल्या उपस्थितीची संमती म्हणून इच्छुक ब्लॉगर्स/वाचकांनी या पोस्टखालील प्रतिक्रियांमधे आपले नाव,ब्लॉगचे नाव (वाचक अथवा भावी ब्लॉगर असल्यास ब्लॉगचे नाव आवश्यक नाही),संपर्कासाठी ईमेल पत्ता द्यावा.

कधी –९ मे २०१०
कुठे –मराठी ग्रंथ संग्रहालय,दादर
किती वाजता –४ ते ७

कृपया नोंद घ्यावी,४ मे २०१० रोजी सायंकाळी ५ वाजता नावनोंदणी बंद करण्यात येईल.

वाचक अथवा भावी ब्लॉगर (http://www.mogaraafulalaa.com/2010/03/blog-post_29.html) ही लिंक आपल्या ईमेलमधून आपल्या स्नेह्यांना पाठवू शकतील.

आपल्या शंका,सूचना व सल्ले खालील ईमेल पत्त्यावर अवश्य पाठवा:

रोहन चौधरी –chaudhari.rohan@gmail.com (http://itihasachyasakshine.blogspot.com/)
महेंद्र कुलकर्णी –kbmahendra@gmail.com (http://www.kayvattelte.wordpress.com/)
कांचन कराई – mogaraafulalaa@gmail.com (http://www.mogaraafulalaa.com/)

धन्यवाद,

संदर्भ:मोगरा फुलला

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes