मुंबई मधल्या रिक्षांची दरवाढ २४ जुन २०१० पासुन लागु झाली. नविन दरवाढीचे फलक व कोणत्याही रिक्षाचालकाने जर कोठेही येण्यास नकार दिला तर त्याची तकरार करण्याकरीता दुरध्वनी क्रमांक फलक वर दिलेला आहे.
रिक्षा दरवाढ फलक डाऊनलोड करा
| ||||||
मुंबई मधल्या रिक्षांची दरवाढ २४ जुन २०१० पासुन लागु झाली. नविन दरवाढीचे फलक व कोणत्याही रिक्षाचालकाने जर कोठेही येण्यास नकार दिला तर त्याची तकरार करण्याकरीता दुरध्वनी क्रमांक फलक वर दिलेला आहे.
रिक्षा दरवाढ फलक डाऊनलोड करा आज तुझा माझा साथ नाही, मुंबई चमकत्या सिनेतारकांची स्वप्नं पाहणाऱ्या एका राजाराणीची अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या घातपाताची फुटपाथवर बसणाऱ्या विक्रेत्यांची गुजराथी मारवाडी व्यापाऱ्यांची मुळ कविता - मी मराठी पावसाळा सुरू झाला की मला घरी बसायला,ऑफिसला जायला खुप कंटाळा येतो. मजा येते ती फक्त पावसात भिजायला,ट्रेकिंगला जायला आणि बाइक फिरवायला. ट्रकिंग आणि भिजण्याचा आनंद तर दर वर्षी घ्यायचो,पण बाईकवर फिरण्याचा आनंद तेव्हढा लुटता आला नाही कारण माझ्याकडे तेव्हा बाईक नव्हती. पावसात बाईक चालवायची मजा काही वेगळीच आहे. पण काल मी ती मजा अनुभवली,मजा कसली थ्रिल होती ती. माझं ऒफिस कांदिवलीला आहे,त्यामुळे मी दररोज कांदिवली –ठाणे असा बाईकने प्रवास कारतो. साधारणता एक –सव्वा तासाचा प्रवास आहे तो. घोडबंदर रोड हा सोइस्कर असल्यामुळे मी नेहमी तीकडुनच ये जा करतो. (घोडबंदर –दहिसर- बोरीवली –कांदिवली). एक मित्र मुलुंड वरुन अजुन ऐका मित्राला घेऊन येतो. असे ते दोघे एका बाईकवर तो आणि मी ऐकटा माझा बाईकवर आम्ही ऐकत्र ऒफिसला जातो. सकाळी ऒफिसला जाताना आम्हाला पाऊस लागला ज्याचा आम्ही पुरेपुर आनंद लुटला. पावसात घोडबंदर रोड खुपच छान दिसत होता. घाटा सारख्या नागमोड्या रस्त्यावर ३०-४० कि प्रति तासाच्या वेगात बाईक चालवायला खुप मजा येत होती. तोच आनंद घेत घेत आम्ही ऒफिसला पोहचलो. संध्याकाळी आम्ही निघायचा आधीच पुन्हा पाऊस पडायला सुरवात झाली होती. तेव्हा पाऊस रीमझिम रीमझिम पडत होता,पण पाऊस धुवादार येणार याचा अंदाज आम्ही आभाळा कडे बघुन लावला होता. १० मिनिटातच आमचा आंदाज खरा ठरला. पावसाने आपला जोर वाढवला. धुवादार पावसाला जोर दार वार्याची साथ होती. बाईकचा वेग कमी होता तरी पण बाईक आवरायला कठीण जात होतं ज्याच पुर्ण श्रेय जोरदार वार्याला जातं. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं आमच्या साथीत कोणा ना कोणाची भर पडत होती. बोरिवली मध्ये पोहचे पर्यंत काळोखाची साथ मिळाली. पाऊसामुळे अंधुक झालेल्या रस्त्यावर अंधारा मुळे गाडी चालवण फारच कठीण जात होतं. त्यात जागो जागी पाणी भरायला सुरूवात पण झाली होती. बरेच वेळातर अंदाजा वर पण गाडी चालवली. दररोजचा रस्ता होता म्हणुन हे अंदाज घेऊन चालवण्याची रिस्क घेतली. दहिसरला असताना ज्या गोष्टीची भीती होती ती चमकली,महणजे वीज. मनात म्हणटल याचीच कमी होती. ह्वदयाचे ठोके आता वाढले होते. पाऊसात भिजण्याचा आनंद आता काही मिळत नव्हता. मनात अता थोडी भीती पण होती. दहिसर चेक नाका ते रेती बंदर हा रस्ता घाटा सारखा आहे व त्या पुर्ण रस्त्यावर लाईट पण नाही आहेत. मन एवढच बोलत होत की तो रस्ता पटकन संपायला हवा. आता काळोख पण वाढला होता त्यामुळ रस्ता दिसायला जास्ती त्रास होत होता. बाईकच्या लाईटची जास्ती काही मदद होत नवती. हेलमेटच्या काचेवर आदळणार्या पाऊसाच्या थेंबांन मुळे हा त्रास होत होता. हेलमेटची काच जर ऊघडली तर तो मारा डोळ्यांन वर होत होता. पण येथे फायदा होता रस्ता माहीत असल्याचा. कोठे वळण आहे,कोठे चढण आहे याचा अंदाज अचुक लागत होता. बरेच वेळा पुढच्या गाडीच्या टेल लाईट ने अंदाज घ्यायला लागायचा. पण जेव्हा वीज चमकायची तेव्हा खुप भीती वाटायची. जेव्हा रेती बंदरच्या वळणावर गाडी पोहचली तेव्हा माझ्या जीवात जीव आला. आत काही भिती नाही हे नक्की होतं कारण ठाणे शहरात प्रवेश झाला होता आणि त्या पुढच्या रस्त्यावर लाईट पण होते. परत पाऊसाचा आनंद घ्यायला मी सुरूवात केली होती. माझ्या चेहर्यावर आनंद परत दिसुलागला होता. जेव्हढा सुंदर प्रवास आमचा सकाळी होता,तेव्हढाच भयंकर तो पावसाळी रात्री होता. जी मजा मला अनुभवायची होती ती अशी अनुभवीन याचा विचार पण नाही केलेला. चूकुन चूकलो, जो चूकेल त्याला नका ओरडू, जो जेवढा जास्तं चूकतो, चूका मुद्दाहुन नाही होत,
आपण अशा राष्ट्रात राहतो जेथे जेथे पिझ्झा अग्निशामक दल,पोलिस आणि आंब्युलेन्स पेक्षा लवकर पोहचवीला जातो. जेथे कार लोन ५% आणि एजुकेशन लोन १२% व्याजा वर दिलं जातो. जेथे तांदुळ ४०/- प्रति किलो आणि सिम कार्ड बिना मुल्य मिळतं जेथे करोडपती दान धर्म करण्या ऐवजी एक क्रिकेट संघ विकत घेतो. जेथे बुट-चपला वातानुकुलित दुकानात मिळता आणि भाज्या रस्त्यावर जेथे सर्वांना प्रसिद्धि हवी आहे,पण कोणालाच कष्ट करुन प्रसिद्ध व्हायचे नाही आहे. जेथे लिंबू सरबत कृ्त्रिम स्वाद घालुन बनवलं जातं आणि लिक्विड डिश वॉश मध्ये अस्सल लिंबाचा रस वापरला जातो. जेथे लोकं चहाच्या टपरी बाल कामगारांनवर लिहिलेला लेख वाचतात आणि बोलतात “लाहान मुलांनकडुन काम करुन घेणार्याला फाशी द्यायला हवी”आणि नंतर हाक मारतात “अरे छोटु २ कटींग आण” संदर्भ:ईमेल आज सकाळची गोष्ट,मी महिनाभर मिशी ठेवली होती आणि आज सकाळी ती काढली. जेव्हा मी ऑफीस मध्ये पोहचलो तेव्हा बर्याच जणांनी मला विचारले “अरे मिशी काढलीस ?”. अरे आता दिसते का मिशी,नाही ना! मग काढलीच असणार ना. गायबतर करु शकत नाहीना मी ? काही वेळेस आपण असे प्रश्न विचारतो,ज्याची उत्तरं आपल्याला आधीच माहीती असतात,तरीही आपण ते विचारतो. असेच काही वायफळ प्रश्न खाली दिले आहेत. प्रश्न:फोन ठेऊ का? प्रश्न:आज उशीर झाला का? प्रश्न:आम्हाला लाडु कधी मिळणार? प्रश्न:व्यवस्थीत जाशील ना का येऊ सोडायला ? प्रश्न:कुठे शॉपिंगला गेलेलात काय? प्रश्न:अय्या किती मोठी झाली ना? प्रश्न:आलास का ? प्रश्न:अरे ! चाल्लास का? प्रश्न:रात्री उशीरा फोन करायचं आणि विचारायच “झोपलेलास का?” प्रश्न:बेल वाजवायची ,दरवाजा उघडायला कुणी पण आलं के विचारायचं “कुणी आहे का घरात”. प्रश्न:जेवताना बघायचं आणि विचारायचं “अरे जेवतोयस का ?” मीही कधी-कधी असे वायफळ प्रश्न विचारतो आणि मनातल्या मनात हसतो. ३ शहरं. १० स्टुडियो. १२ ध्वनिमुद्रक. ६५ वादक कलाकार,११२ प्रस्थापित गायक. ३५६ समूहगायक. २००० लोकांचा सकारात्मक सहभाग…. आणि यांना एका सूत्रात बांधणारी कविवर्य सुरेश भट यांची अजरामर कविता.. अर्थात भारतातील सर्वात भव्य गीत…लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी!! हे जगातलं सर्वात भव्य गीत का तयार झालं याविषयी - [ खालील सत्य हे खुद्द कौशल इनामदार यांनी लिहिलं आहे. संदर्भ:मुंबईकर ] आपल्याला पाय आहेत ही जाणीव आपल्याला सर्वात अधिक कधी होते? खूप चालून पाय दुखू लागले की जशी पायांच्या अस्तित्त्वाची आपल्याला जाणीव होते तशी एरवी कधीच होत नाही! पडसं झालं की नाकाच्या अस्तित्त्वाची जाणीव,बोट चिमटलं की बोटाच्या अस्तित्त्वाची जाणीव! तसंच जेव्हां माझी अस्मिता दुखावली गेली तेव्हां मी एक मराठी माणूस,एक मराठी संगीतकार असल्याची जाणीव मला झाली. एका जिंगलच्या ध्वनिमुद्रणाच्या निमित्ताने मी मुंबईमधल्या एका व्यावसायिक रेडियो वाहिनीच्या (एफ.एम् स्टेशन) स्टुडियोमध्ये गेलो होतो. काम झाल्यावर तिथे माझा मित्र असलेल्या एका रेडियो जॉकीला अगदी सहज विचारलं – “काय रे,तुमच्या वाहिनीवर मराठी गाणी का नाही लागत?” “आमची पॉलिसी आहे.” त्याने उत्तर दिलं. “तुमची महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी गाणी न लावण्याची पॉलिसी आहे?!” मी आश्चर्याने विचारलं. त्याने मान डोलावली. “अशी पॉलिसी तुमची भारताच्या कुठल्या इतर शहरामध्ये आहे? कोइमतूरमध्ये तमिळ गाणी लावणार नाही,अशी पॉलिसी आहे? बेंगळूरूमध्ये कन्नड गाणी लावणार नाही,अशी पॉलिसी आहे? कोलकात्यामध्ये बंगाली गाणी लावणार नाही,अशी पॉलिसी आहे?” “अरे,मुंबईची गोष्ट वेगळी आहे मित्रा!” त्याने मला समजावलं. “मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे.” “मान्य आहे ना. कॉस्मोपॉलिटन बेंगळुरूही आहे! पण तिथे कन्नडा गाणी लागतात की. कारण बेंगळुरू कर्नाटकाची राजधानी आहे. तसं मुंबईही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग इथे मराठी गाणी लावायची नाहीत,असं धोरण तुम्ही अवलंबता?” पहिल्यांदा माझा मित्र निरुत्तर झाल्यासारखा झाला. मी पुढे म्हणालो – “तुम्ही हिंदी गाणी लावता,आणि त्याचा आनंद आहेच आम्हाला. तुम्ही पंजाबी गाणी लावता,याचाही आनंद आहे. पण पंजाबी ते कॉस्मोपॉलिटन आणि मराठी ते व्हर्नॅक्युलर हा न्याय कुठला? म्हणजे रब्बीचं ‘बुल्ला की जाणां’ तुम्हाला चालतं,पण सलील-संदीपच्या ‘डिबाडी डिबांग’चं तुम्हाला वावडं का?” हे ऐकल्या नंतर मात्र त्या रेडियो जॉकीने शस्त्र खाली ठेवली. तो म्हणाला – “अरे खरं सांगायचं तर आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना,त्यांना असं वाटतं की मराठी गाणी लावली तर रेडियो स्टेशनला एक ‘डाउनमार्केट फील’ येईल.” इथे मात्र मी चमकलो. ‘डाउनमार्केट फील’? मराठी मुळे? एखादी भाषा ‘डाउनमार्केट’ असते असं ठरवण्याचा अधिकार या तथाकथित वरिष्ठ अधिकार्यांना कोणी दिला? आणि मराठी डाउनमार्केट म्हणजे हास्यास्पद विधान होतं! युनेस्कोच्या एका सर्व्हेनुसार जागात सुमारे ६५०० भाषा आणि बोली भाषा आहेत. यात सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषा क्रमवार लावल्या तर एन्कार्टा विश्वकोशाप्रमाणे मराठीचा क्रमांक पंधरावा आहे. पंधरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही आकडेवारीच्या जोरावरच ‘डाउनमार्केट’ कशी असू शकते? इतकंच नव्हे,तर काही वर्षांपूर्वी अमेरिकाच्या ‘नासा’ या संस्थेने ‘व्होयेजर’ नावाचं एक यान अंतराळात पाठवलं होतं. त्या यानातून पृथ्वीवरच्या संस्कृतीची नोंद करणारी एक ‘ग्रामोफोन रेकॉर्ड’ अंतराळात पाठवण्यात आली आहे. या ध्वनिमुद्रिकेचा हेतू हा की परग्रहावरल्या जीवांना पृथ्वी आणि तिच्या संस्कृतीची माहिती उपलब्ध व्हावी. या ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये परग्रहवासीयांच्या नावे एक संदेश ध्वनिमुद्रित केला गेला आहे. हा संदेश जगाच्या ५५ भाषांमध्ये ध्वनिमुद्रित केला आहे,ज्यामध्ये भारतातल्या ९ भाषा आहेत. या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. (मराठीमधला हा संदेश तुम्ही इथे ऐकू शकता!) इथेच ही कथा संपत नाही. याच ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये पृथ्वीतलावरचं संगीतही ध्वनिमुद्रित करून पाठवलं आहे. जगाच्या वेगवेगळ्या कोपर्यातल्या संगीताचा यात समावेश आहे. अमेरिका,मेक्सिको,जर्मनी,अज़रबैजान,पेरू,चीन,बल्गेरिया,इंग्लंड,रशिया,ऑस्ट्रिया,अशा विविध देशांमधलं संगीत या ध्वनिमुद्रिकेत आहे. यात भारताच्या संगीताचं प्रतिनिधित्व केसरबाई केरकर करतात. त्यांची बंदिश – ‘जात कहाँ हो’ – ही या ध्वनिमुद्रिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. तात्पर्य काय – तर जिथे ‘नासा’ला अंतराळातही कुणी परग्रहवासी मराठी समजू शकेल असं वाटतं,तिथे महाराष्ट्राच्या राजधानीतच “तुमची भाषा ‘डाउनमार्केट’ वाटेल” असं म्हणणार्या या रेडियोच्या ‘वरिष्ठ’ अधिकार्यांचा मला मनस्वी राग आला! बरं,मराठी गाणी महाराष्ट्रात ऐकायची नाहीत तर कुठे आसाममध्ये ऐकायची?! त्या रेडियोजॉकी मित्राशी फार वाद न घालताच मी बाहेर पडलो आणि मला आढळलं की ही परिस्थिती मुंबईत आणि महाराष्ट्राच्या बहुतांश शहरांमध्ये अशीच आहे. मुंबईमध्ये व्होडाफोनसारख्या मोबाईल कंपन्या मराठीतून बोलायला नकार देत होत्या. पुण्यामधल्या रेडियो वाहिन्या नवी मराठी गाणी वाजवायला नकार देत होत्या. चित्र विदारक होतं! मुंबईमधली परिस्थिती अधिक बिकट होती आणि आहे. आज मुंबईमध्ये आपल्याला भाजीपाला मराठीतून विकत घेता येत नाही की एका जागेहून दुसर्या जागी मराठीतून जाता येत नाही! म्हणजे महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठेही दिसत नाही! प्रश्न फक्त मुंबईचाही नव्हता. मराठी लोकांमध्येच मराठी भाषेच्या बाबतीत एक औदासिन्य आहे,असं प्रकर्षाने जाणवत होतं. मुळातच मराठी ‘डाउनमार्केट’ आहे,हा संकेत इतर भाषकांपर्यंत पोचतो तरी कुठून? कुणाकडून? आणि उत्तर येतं – आपल्याकडून! आणि धोक्याचा इशारा तेव्हाच असतो जेव्हा आपल्यालाच आपली भाषा डाउनमार्केट आहे असं वाटू लागतं. माझ्या मनात विचार आला की आपण राजकारण्यांना शिव्या घालतो,सरकारच्या नावाने ठणाणा करतो,पण या सगळ्या प्रश्नाबाबत आपण काय करतोय? असा आत्मपीडाकारक प्रश्न सतत मला भेडसावत राहिला. पण मी काय करू शकत होतो? मी संगीतकार आहे आणि मी गाणं करू शकतो एवढंच एक सत्य माझ्या डोळ्यासमोर दिसत राहिलं. इतर भाषकांना “मराठीचा आदर बाळगा” असं सांगण्याअगोदर खरी गरज होती ती मराठी पुढचा भाग लवकरच … मराठी अभिमानगीत ३ शहरं. ९ स्टुडियो. १२ ध्वनिमुद्रक. ६५ वादक कलाकार. ११२ प्रस्थापित गायक. ३५६ लोकांचं समूहगान. २००० लोकांचा सकारात्मक सहभाग. …आणि कविवर्य सुरेश भट यांच्या लेखणीतून उतरलेले अजरामर शब्द – भारतात निर्माण झालेलं सर्वात भव्य गीत संगीत- कौशल श्री. इनामदार सहभागी गायकांची नावे रवींद्र साठे,अश्विनी भिडे-देशपांडे,सुरेश वाडकर,पद्मश्री पद्मजा फेणाणी,आशा खाडिलकर,आरती अंकलीकर-टिकेकर सत्यशील देशपांडे,श्रीधर फडके,साधना सरगम,शौनक अभिषेकी,संजीव चिम्मलगी,सावनी शेंडे-साठये,स्वप्नील बांदोडकर बेला शेंडे,अवधूत गुप्ते,प्रसाद ओक,सुनील बर्वे,शैलेश दातार,सुमीत राघवन,मधुराणी प्रभुलकर,सीमा देशमुख, विठ्ठल उमप,देवकी पंडित,उत्तरा केळकर,रंजना जोगळेकर,महेश मुतालिक,अनिरुद्ध जोशी,अनघा पेंडसे, सलील कुलकर्णी,माधव भागवत,संगीता चितळे,अनुजा वर्तक,भाग्यश्री मुळे,सायली ओक,मधुरा कुंभार,आनंदी जोशी अनघा ढोमसे,महालक्ष्मी अय्यर,शंकर महादेवन,मिलिंद इंगळे,कौशल श्री. इनामदार,वैशाली सामंत,अच्युत ठाकूर उदेश उमप,आदेश उमप,संदेश उमप,नंदेश उमप,हम्सिका अय्यर,निहिरा जोशी,अजित परब,ऋषिकेश कामेरकर, योगिता पाठक,विभावरी आपटे-जोशी,मधुरा दातार,अमृता नातू,संजीवनी भेलांडे,मिलिंद जोशी,मनीषा जोशी, निलेश मोहरीर,योगिता चितळे,आनंद सावंत,मंदार आपटे,ऋषिकेश रानडे,जितेंद्र अभ्यंकर,अमोल बावडेकर अभिजित राणे,नेहा राजपाल,शिल्पा पै,जान्हवी प्रभु-अरोरासोनाली कर्णिक,मिथिलेश पाटणकर,विनय राजवाडे मनोज देसाई,मयुरेश पै,प्रशांत काळुंद्रेकर,त्यागराज खाडिलकर,मुग्धा वैशंपायन,कार्तिकी गायकवाड,प्रथमेश लघाटे रोहित राऊत,आर्या अंबेकर,वर्षा भावे,रवींद्र बिजूर,अजय गोगावले,अतुल गोगावले,हरिहरन,म्रुदुला दाढे-जोशी, राजा काळे,राम देशपांडे,स्वानंद किरकिरे,ओंकार दादरकर,माधुरी करमरकर,अमृता काळे,स्वप्नजा लेले,संदीप उबाळे आशोक पत्की,कल्याणी पांडे. गेले दोन अडीज वर्ष मी इंग्रजी ब्लॉग लिहितो. मग मराठीचा मुद्दा आला आणि लगेच विचार केला की मी पण मराठी ब्लॉगर बनणार. ब्लॉगचं नाव ठरवण्यात सरवात जास्त वेळ गेला. खर सांगतो बाळाचं नाव ठरवण सोपं आहे,पण ब्लॉगचं नाही. एकाच नावाचे ४ पोर असू शकतात पण एका नावाचे २ ब्लॉग नाही. ज्या नावाचा मी विचार करायचो ते आधीच कुणी तरी घेतलेल असायचं. बरेच वेळा मी निराश झालो पण मराठी ब्लॉग सुरु करायचाच ह्या जिद्दिने कधी हार नाही मानली. बर्याच मित्रांना पण सांगितले की छान नाव सुचवा आणि बर्याच जणांनी छान नावं सुचवली पण,पण ती अधीच गेलेली होती. ३० मार्चला मित्राने रगडा पॅटीस हे नाव सुचवलं,मला ही ते आवडलं आणि चक्क ते कुणी घेतल ही न्हवत. ३१ मार्चला रगडा पॅटीस वर मराठी अभिमान गीताच्या रुपाने मराठी ब्लॉगींग मध्ये माझे पदार्पण झाले. | ||||||
| Copyright ©2012 रगडा पॅटीस - All Rights Reserved | ||||||