Ragda Patties
रगडा पॅटीसचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.
<a href= "http://www.ragdapatties.com/" target="_blank"><img alt="Ragda Patties" src="http://tinyurl.com/yavjcty"></a>

कर्नाळा ट्रेक

३ महिन्यांचा कालांतरा नंतर आमच्या  ग्रौप ने ट्रेक करायचा ठरवले . खूप उष्ण वातावरण असल्या मुळे,गर्मीत आम्ही ट्रेक नाही केले .पाऊसात  ट्रेक करायला सर्वांना आवडतं म्हाणून आम्ही कर्नाळाला जायचा ठरवलं. तारीख ठरली २७ जून २०१०.

Karnala map

Image Courtesy - trekshitiz.com

ठाणे ते पनवेल ट्रेन ने जायचं आणि सकाळी ६ वाजता ठाणे स्टेशन वर भेटायचा ठरेल.  ६.२४ ची लोकाल होती आणि आम्ही जरा आधीच भेटलो. एक मित्र यायचा बाकी होता ज्याच्या कडे सर्वांचे तिकीट होते. ट्रेन ला पिवळा सिग्नल मिळालेला होता आणि त्याचा कुठे पत्ता नव्हता. आम्ही ट्रेन मधून उतरण्याचे ठरवले एव्ड्यात तो धावत आला. तो जसा ट्रेन मध्ये चढला ,तशी ट्रेन निघाली.

In Thane-Panvel LocalPanvel Station

ट्रेकचा खर्च १५० रु प्रती व्यक्ती आस ठरवला होता. ह्या ट्रेकला आम्ही एकूण १७ जण होतो. ७.१५ ला आम्ही पनवेलला पोहचलो. सर्वांना भूक लागली असल्या मुळे आम्ही पनवेल एस . टी स्टेन्ड जवळ असलेल्या एका हॉटेल मध्ये नाश्ता केला. अलिबागला जाणारी बस कर्नाळा वरून जाते म्हाणून आम्ही  ८.१० ला बसची विचारपूस केली,तेव्हा कळले क बस ८.३० ला आहे. बस यायला वेळ होती म्हाणून मी आणि प्रवीण कर्नाळाला जाणार्या टमटमची (६ सीटर) विचारपूस करायला गेलो. तेव्हा कळले की एक टमटम कर्नाळाला जायचे १५० रुपये घेते. आम्ही १७ जण होतो म्हाणून आम्ही २ टमटम  घेतल्या.  पनवेल –कर्नाळा मधील अंतर १४ कि.मी आहे. ३० मी. मध्ये आम्ही कर्नाळा ला पोहचलो.

Karnala Area Map Entry fee Board

कर्नाळा,पक्षी अभयारण्यासाठी सुधा प्रसिद्ध आहे,त्या मुळे तेथे बरीच लोक येतात. कार पार्किंग साठी सुधा जागा आहे.  प्रति व्यक्ती २० रु प्रवेश शुल्क आहे. प्लास्टिक बाटल्या जर आपल्या जवळ असतील तर १०० रु दिपोझीट ठेवाव लागतात. जेव्हढ्या बाटल्या घेऊन जातोय तेव्हढ्या बाटल्या येताना असतील तर १०० रु ते परत देतात.

Karnala Booking OfficeIntroduction Session

किल्ल्याचा रस्ता पक्षी अभयारण्यातून आहे. आम्ही जेव्हा ट्रेक सुरु केला तेव्हा पहेले १०-१५ मिनिट डांबरी रस्त्यावरून चालत होतो. खरा ट्रेक तेव्हा सुरु झाला जेव्हा आम्ही डांबरी रस्ता सोडून झाडाझुडुपात लपलेल्या पाय वाटेवरून चालायला सुरु केले. तेथे वेगवेगळी झाड सुद्धा आहेत ज्यांचावर त्यांची नावं लिहिलेली सापडतात. किल्ला चढणं काही कठीण नाही आहे फक्त काही ठिकाणी लाल माती आहे जी थोडी घसरडी आहे.  वेगवेगळ्या प्रकारची किडे पण तेथे सापडतात. आम्ही थांबत आणि मस्ती करत जात होतो म्हणून आम्हाला २ तास किल्ला चढायला लागले. किल्ल्याचा आंत जायला जिने आहेत. किल्ल्या वरून प्रबळगड ,इरशाळगड आणि माथेरान चा दर्शन होत. किल्ल्याचा इतिहास फार छान आहे . इतिहास  विकिपीडिया तून वाचा.

Tree in KarnalaTree in Karnala

किल्ला चढताना पाऊसाने बिलकुल हजेरी लावली नाही. किल्ला चढल्यावर सुद्धा आजुबाजूच्या परिसरात पाऊस दिसत होता पण किल्ल्यावर मात्र सगळी जण पाऊसा साठी तरसली होती. आम्ही जेवण सुरु करणार तेव्हढ्यात पाऊसाने हजेरी लावली.  पाऊस येताना जोरदार वार्याला घेऊन आला. आम्ही पाऊसातच जेवायचं ठरवले. त्या जागेवर आम्ही १ तास आराम केला आणि मग रुश्मीने किल्ल्याचा इतिहास सांगितला. उतरताना मात्र आम्हाला पाऊसाने बरेच वेळा भिजवलं.  दीड तासात आम्ही खाली उतरलो आणि पिंजर्यात असलेल्या पक्षांना बघायला गेलो. पिंजर्यामध्ये मोर ,बदक ,ससा ,पोपट ,होते. मोर आपला पिसारा फुलवून गोल गोल फिरत होता.  सर्वजण त्याचे फोटो काढत होते.  बदक शिंकत आणि जांभळी देत होता. मग तिकडून आम्ही प्रवेश द्वारावर गेलो आणि घेऊन गेलेल्या प्लास्टिक बाटल्या दाखवून दिपोझीट दिलेले १०० रु परत घेतले.

PeacockDuck

पनवेल ला जायला २ परियाय आहेत ,पहेला म्हणजे टमटम चालकाचा फोने नंबर घेऊन ठेवणे ज्या टमटमने आपण आलो आणि जाईचा वेळी त्याला फोने करून बोलावणे,टमटमवाले अशा वेळी ५० रु अधिक मागतात म्हणजे जाताना ते २०० रु १ टमटम आणि दुसरा मार्ग म्हणजे अभयारण्याच्या बाहेर पनवेलच्या दिशेने जाणार्या बसची वाट बघायची. आम्ही टमटम वाल्याचा नंबर घेतलेला होता पण त्याचा फोने बंद होता म्हणून आम्ही बसची वाट पाहत उभे राहिलो. अलिबागच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर एका अपघाता मुळे वाहतूक ठप्प झाली होती. कोणतरी मला सांगितले के अपघात जवळच झाला आहे म्हणून मी आणि सिद्धेश माझा कॅमेरा घेऊन त्या देशेने गेलो. परत येताना प्रविण भेटला आणि बोलला के १२ जण एका ६ सीटर ( आता ६ सीटर बोलणे बरोबर नाही  ) मधून पुढे गेले आणि आम्ही फाकते ५ जण आता उरलो आहोत. वाहतूक परत सुरळीत होयला सुरवात झाली होती म्हणून आम्ही बस किव्हा टमटमच्या शोधात पळालो. नशिबाने आम्हाला एक बस मिळाली जीने आम्हाला पनवेल एस . टी स्टेन्ड जवळ सोडलं. आम्हाला ६.१८ ची पनवेल –ठाणे ट्रेन मिळाली. जेव्हा आम्ही एकूण झालेला खर्च काढला तेव्हा सर्वांना आश्चर्य झाला कारण एकूण खर्च फक्त १०० रु प्रति व्यक्ती  झाला होता. ७.१५ ला आम्ही ठाण्यात पोहचलो आणि पुढच्या ट्रेकला नक्की परत सर्व जण भेटू आशी हमी दिली.

Qualis Accident Police at accident spot

कर्नाळा पक्षी अभयारण्या बद्दल अधिक वाचा.

Karnala Trek Group

The Trek Group

कर्नाळाला कसे जायचं
परीयाय १:दिवा वरून ,दिवा –वसई ट्रेन
परीयाय २:कुर्ला वरून ,कुर्ला –पनवेल ट्रेन
परीयाय ३:ठाणे वरून ,ठाणे –पनवेल ट्रेन,नाहीतर ठाणे –वाशी ,वाशी –पनवेल

ठाणे ते पनवेल तिकीट भाडे १४ रु .

एस . टी स्टेन्ड स्टेशन पासून ५ मिनिटच्या अंतर वर आहे. अलिबाग ला जाणार्या एस . टी कर्नाळा वरून जातात.

कर्नाळाला जाणार्या टमटम गांधी हॉस्पिटलच्या समोर उभ्या असतात. एस . टी स्टेन्ड पासून ५ मिनिटांच्या अंतरावर आहे .

पनवेल ते कर्नाळा टमटमवाले  १५० रु घेतात. टमटमवाल्याचा फोने नुंबर घेऊन ठेवा येताना उपयोगी ठरेल. येताना टमटमवाले  २०० रु भाडे घेतात (एकदा टमटमवाल्या बरोबर बोलून खात्री करून घेणे )

कर्नाळा ते पनवेल
पनवेलला जाणार्या  एस . टी बस ,तिकीट १७ रु
नाहीतर टमटम ,१५ रु प्रति व्यक्ती   एस . टी स्टेन्डला सोडतील

No related posts.

Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.

Leave a Reply

  

  

  

You can use these HTML tags

<a href=""title=""><abbr title=""><acronym title=""><b><blockquote cite=""><cite><code><del datetime=""><em><i><q cite=""><strike><strong>

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes