Ragda Patties
रगडा पॅटीसचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.
<a href= "http://www.ragdapatties.com/" target="_blank"><img alt="Ragda Patties" src="http://tinyurl.com/yavjcty"></a>

थ्रिलर अनुभव

पावसाळा सुरू झाला की मला घरी बसायला,ऑफिसला जायला खुप कंटाळा येतो. मजा येते ती फक्त पावसात भिजायला,ट्रेकिंगला जायला आणि बाइक फिरवायला. ट्रकिंग आणि भिजण्याचा आनंद तर दर वर्षी घ्यायचो,पण बाईकवर फिरण्याचा आनंद तेव्हढा लुटता आला नाही कारण माझ्याकडे तेव्हा बाईक नव्हती. पावसात बाईक चालवायची मजा काही वेगळीच आहे. पण काल मी ती मजा अनुभवली,मजा कसली थ्रिल होती ती.

माझं ऒफिस कांदिवलीला आहे,त्यामुळे मी दररोज कांदिवली –ठाणे असा बाईकने प्रवास कारतो. साधारणता एक –सव्वा तासाचा प्रवास आहे तो. घोडबंदर रोड हा सोइस्कर असल्यामुळे मी नेहमी तीकडुनच ये जा करतो. (घोडबंदर –दहिसर- बोरीवली –कांदिवली). एक मित्र मुलुंड वरुन अजुन ऐका मित्राला घेऊन येतो. असे ते दोघे एका बाईकवर तो आणि मी ऐकटा माझा बाईकवर आम्ही ऐकत्र ऒफिसला जातो.

सकाळी ऒफिसला जाताना आम्हाला पाऊस लागला ज्याचा आम्ही पुरेपुर आनंद लुटला. पावसात घोडबंदर रोड खुपच छान दिसत होता. घाटा सारख्या नागमोड्या रस्त्यावर ३०-४० कि प्रति तासाच्या वेगात बाईक चालवायला खुप मजा येत होती.  तोच आनंद घेत घेत आम्ही ऒफिसला पोहचलो.

संध्याकाळी आम्ही निघायचा आधीच पुन्हा पाऊस पडायला सुरवात झाली होती. तेव्हा पाऊस रीमझिम रीमझिम पडत होता,पण पाऊस धुवादार येणार याचा अंदाज आम्ही आभाळा कडे बघुन लावला होता. १० मिनिटातच आमचा आंदाज खरा ठरला. पावसाने आपला जोर वाढवला. धुवादार पावसाला जोर दार वार्याची साथ होती. बाईकचा वेग कमी होता तरी पण बाईक आवरायला कठीण जात होतं ज्याच पुर्ण श्रेय जोरदार वार्‍याला जातं.

जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं आमच्या साथीत कोणा ना कोणाची भर पडत होती. बोरिवली मध्ये पोहचे पर्यंत काळोखाची साथ मिळाली.  पाऊसामुळे अंधुक झालेल्या रस्त्यावर अंधारा मुळे गाडी चालवण फारच कठीण जात होतं.  त्यात जागो जागी पाणी भरायला सुरूवात पण झाली होती. बरेच वेळातर अंदाजा वर पण गाडी चालवली.  दररोजचा रस्ता होता म्हणुन हे अंदाज घेऊन चालवण्याची रिस्क घेतली.

दहिसरला असताना ज्या गोष्टीची भीती होती ती चमकली,महणजे वीज. मनात म्हणटल याचीच कमी होती.  ह्वदयाचे ठोके आता वाढले होते. पाऊसात भिजण्याचा आनंद आता काही मिळत नव्हता. मनात अता थोडी भीती पण होती.  दहिसर चेक नाका ते रेती बंदर हा रस्ता घाटा सारखा आहे व त्या पुर्ण रस्त्यावर लाईट पण नाही आहेत.  मन एवढच बोलत होत की तो रस्ता पटकन संपायला हवा.

आता काळोख पण वाढला होता त्यामुळ रस्ता दिसायला जास्ती त्रास होत होता.  बाईकच्या लाईटची जास्ती काही मदद होत नवती.  हेलमेटच्या काचेवर आदळणार्‍या पाऊसाच्या थेंबांन मुळे हा त्रास होत होता. हेलमेटची काच जर ऊघडली तर तो मारा डोळ्यांन वर होत होता. पण येथे फायदा होता रस्ता माहीत असल्याचा. कोठे वळण आहे,कोठे चढण आहे याचा अंदाज अचुक लागत होता. बरेच वेळा पुढच्या गाडीच्या टेल लाईट ने अंदाज घ्यायला लागायचा.  पण जेव्हा वीज चमकायची तेव्हा खुप भीती वाटायची.

जेव्हा रेती बंदरच्या वळणावर गाडी पोहचली तेव्हा माझ्या जीवात जीव आला. आत काही भिती नाही हे नक्की होतं कारण ठाणे शहरात प्रवेश झाला होता आणि त्या पुढच्या रस्त्यावर लाईट पण होते. परत पाऊसाचा आनंद घ्यायला मी सुरूवात केली होती. माझ्या चेहर्यावर आनंद परत दिसुलागला होता.

जेव्हढा सुंदर प्रवास आमचा सकाळी होता,तेव्हढाच भयंकर तो पावसाळी रात्री होता. जी मजा मला अनुभवायची होती ती अशी अनुभवीन याचा विचार पण नाही केलेला.

No related posts.

Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.

3 comments to थ्रिलर अनुभव

  • Manasi Gargatte

    ekdam chan aahe…..

  • Trupti

    खुपच exciting!!!

  • सचिन पाटील

    मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि ठाणे यांना जोडणारा घोड्बंदर रोड बाईकींग साठी माझ्याही अतिशय आवडीचा आहे.एका बाजूला संजय गांधी अभयारण्याच्या हिरव्यागार रांगा आणि दुसरया बाजूला वसईच्या खाडीचे विस्तिर्ण पात्र अशी अप्रतिम साथ घोड्बंदर मार्गाला लाभली आहे.रस्त्याचे चौपदीकरण झाल्यामुळे भाईंदर ते ठाणे हा प्रवास अवघ्या ४० मिनिटातच पुर्ण करता येतो.

Leave a Reply

  

  

  

You can use these HTML tags

<a href=""title=""><abbr title=""><acronym title=""><b><blockquote cite=""><cite><code><del datetime=""><em><i><q cite=""><strike><strong>

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes