मराठी अभिमान गीत,सुरेश भट यांची एक कविता,जीला संगीतकार कौशल इनामदार यांनी गाण्यात रुपांतर केल.
“लाभले अमास भाग्य बोलतो मराठी”हे गाण तब्बल ११२ गायक आणि ३५६ समुह गायक यांनी गायल आहे.
मराठी अभिमानगीत घरपोच योजना –दूरध्वनि ९७०२०००१११
मराठी अभिमान गीत डाउनलोड करा
गाण्याचे बोल
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
मराठी अभिमान गीत डाउनलोड करा
No related posts.
Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.




Awesome Composition!!!!
10/10
I like,ilove song
Hi bhagyashree,
Please spread this song .
I love thise song Jay maharashtra
ABHINANDAN. ABHINANDAN. ABHINANDAN. 1 NO GANE. TUMCH ANI SURESHJINCH MANAPASUN ABHINANDAN. JAY MAHARASHTRA………..
i love this song and i really proud of i am marathi
Labhale amhas bhagya janmalo MARATHI